"दिल दिमाग और बत्ती" या मराठी सिनेमाचा ट्रेलर आणि म्युझिक लाँच सोहळा नुकताच एका दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या प्रसंगी चित्रपटाचे लेखक – दिग्दर्शक हृषीकेश गुप्ते, प्रस्तुतकर्त्या डॉ. निवेदिता एकबोटे यांच्यासह सर्व कलाकार व तंत्रज्ञ उपस्थित होते.या आधी प्रदर्शित झालेल्या पोस्टर्स आणि टीझरने प्रेक्षकांना ८० च्या दशकातील इस्टमन कलर चित्रपटांचा फील दिला आणि आता प्रदर्शित झालेला ट्रेलर प्रेक्षकांना थेट त्या काळात घेऊन गेला आहे.